न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १२ फेब्रुवारी २०२५) :- वकिलाविरोधात सदोष सेवा दिल्याबद्दलची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राह्य धरली जाणार नाही, असे निष्कर्ष नोंदवित पुण्याच्या ग्राहक आयोगाने वकिलाविरोधात पक्षकाराने केलेली तकार फेटाळली.
वकिलाने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली नाही, म्हणून त्याने फी सव्याज परत करावी, या मागणीसाठी पक्षकाराने ग्राहक आयोगात दाद मागितली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखला देऊन ग्राहक आयोगाला वकिलाच्या सेवेविषयीचा वाद चालविण्याचा अधिकार नाही, असे नमूद करत पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्या शुभांगी दुनाखे व सरिता पाटील यांनी हा निकाल दिला.
यासंदर्भात वारजे परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने डेक्कन जिमखाना परिसरातील ज्येष्ठ वकिलाविरोधात ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. त्यामध्ये संबंधित वकिलाची बाजू एका वकिलांनी मांडली होती. तक्रारदाराने कौटुंबिक न्यायालयात दाखल असलेल्या एका वैयक्तिक दाव्यात बाजू मांडण्यासाठी संबंधित ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती केली होती. त्यासाठी तक्रारदाराने वकिलाला ७५ हजार रुपये फी दिली. परंतु, वकिलाने न्यायालयात आपली बाजू प्रभावीपणे मांडली नाही, असा दावा करून तक्रारदाराने ग्राहक आयोगात धाव घेतली. वकिलाने त्रुटीयुक्त सेवा दिली असून, त्यानी आपली फी सव्याज परत करावी, अशी मागणी केली होती.



















1 Comments
📉 You have received a message(-s) # 975332. Read >> https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=d0530b7593efa794ac8a9bed5e28c8af& 📉
nkihrf