न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कार्यकाल आज शुक्रवार (दि. १७ मे) रोजी संपुष्टात येत आहे.
त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने पक्षश्रेष्ठी नवीन चेह-याला संधी देणार की साने यांना मुदतवाढ मिळणार याबाबत चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयुर कलाटे हे इच्छूक आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.











