न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२५) :- निगडीतील महाराणा प्रताप पुतळा ते यमुनानगर कॉर्नर येथील लहान रस्त्यावर दुचाकीचालक त्याच्या वाहनासह गुरुवारी नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
निगडी बस थांब्यापासून ते यमुनानगर कॉर्नर एक नंबरची इमारत येथे ये-जा करण्यासाठी वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. रस्त्याच्या बाजूला असलेली संरक्षण जाळी तुटलेली आहे. इथे पालिकेकडून स्थापत्यविषयक काम सुरु आहे.
‘फ’ क्षेत्रिय कार्यालयाने हा लहान रस्ता बॅरिकेड लावून कायमचा बंद करावा. जेणेकरून वाहनांची वर्दळ इथे होणार नाही. त्यामुळे अपघात देखील घडणार नाहीत.
– सचिन काळभोर, भारजपा चिटणीस – पिंपरी चिंचवड शहर…












