न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी नगररचना विषयक प्रशिक्षणासाठी अहमदाबाद येथील CEPT University येथे गेले आहेत.
त्यात ५० प्रशिक्षणार्थी पहिल्या पाळीत (दि. १०) ते (दि. १४) तसेच दुसऱ्या पाळीत (दि. २४) ते (दि. २८) या कालावधीत कामकाज विषयक प्रशिक्षण घेणार आहेत.
त्यासाठी ४७,२७,०८०/ इतकी प्रशिक्षण फी रकमेस महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती सभेत मंजुरी दिली आहे. ही रक्कम कामगार कल्याण विभागाकडील “कर्मचारी व अधिकारी प्रशिक्षण” या लेखाशीर्षामधून खर्ची करण्यात येणार आहे.











