न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. १४ फेब्रुवारी २०२५) :- देहूरोड परिसरात वाढदिवस साजरा करण्याच्या किरकोळ वादातून विक्रम गुरुस्वामी रेड्डी (वय ३७ वर्ष) या व्यक्तीची पिस्तुलातुन गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
हा प्रकार गुरुवारी रात्री १२:३० वाजता घडला. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली आहे.











