न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२५) :- पिंपळे निलख येथील २३ वर्षीय तरुणावर तिघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी कोयत्याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले आहे.
ही घटना (दि. १३) रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास न्यू डीपी रोड पिंपळे निलख येथे घडली आहे. याप्रकरणी गौरव साठे (वय २३ वर्ष, रा. पिंपळे निलख) याने आरोपी आदित्य भवाळ, राज पोहरकर आणि त्याचा अनोळखी मित्र यांच्या विरोधात सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
दरम्यान पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे हे करीत आहेत.











