न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १४ फेब्रुवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ४ हजार २११ कोटी रुपये जमा-खर्चाचा अर्थसंकल्प बुधवारी (दि. १२) प्राधिकरण सभेत सादर करण्यात आला. २९२ कोटी रुपयांच्या शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
या अर्थसंकल्पात पीएमपीएमएलला ५०० बसेस घेण्यासाठी २३० कोटी रुपयांची तरतुद केली आहे. हा निधी युटीएफ अंतर्गत जमा होणारे १०० टक्के वाढीव विकास शुल्क अथवा पीएमआरडीएच्या स्वनिधीतून भागविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. अर्थसंकल्पामध्ये एकूण महसुली जमा रक्कम ४ हजार २९९ कोटी तर, भांडवली जमा रक्कम २०४ कोटी इतकी आहे. एकूण महसुली खर्च ७०४ कोटी तर, भांडवली खर्च ३ हजार ५०७ कोटी इतका आहे.
पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशी एकूण ४ प्रादेशिक आणि ९ तालुका कार्यालये नव्याने स्थापित करण्याचे नियोजन आहे. तहसीलदार/गटविकास अधिकारी/नगरपालिका कार्यालयात किंवा किमान १ हजार चौरस फूट जागा भाड्याने घेऊन ही कार्यालये सुरु केली जाणार आहे. त्यासाठी सभेत मंजुरी देण्यात आली आहे. नागरिकांना गुंठेवारी अंतर्गत अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंतच होती. पीएमआरडीएच्या २०२५ च्या मंजूर आकृतीबंधात पोलिस उपअधीक्षक पदाऐवजी पोलिस अधीक्षक पदाला या सभेत मंजुरी दिली आहे. अतिक्रमण प्रतिबंधासाठी बांधकामे पाडण्याच्या कारवाईसाठी बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणेशी समन्वय राखण्याची जबाबदारी संबंधित पोलिस अधीक्षकांवर असणार आहे.
















1 Comments
📂 Ticket: Operation #KS66. LOG IN >> https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=850cd87b8768a7960d93cdb76e9ab9a1& 📂
c70eui