न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- निगडी ते पिंपरी मेट्रोचे काम चोवीस तास सुरू आहे. ड्रिल मशीनने खड्डा खोदताना मोठा आवाज येत आहे. सध्या दहावी-बारावी परीक्षा सुरू असून हे काम रात्री बंद करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रोचे काम त्वरित बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला.
पिंपरी ते निगडीदरम्यानच्या मेट्रो प्रकल्प काम रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद करण्यात यावे. रात्री ड्रिल मशीनने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत असल्याने मोठा आवाज येतो, परिणामी परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास होतो.
सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून त्यांची झोपमोड होते. रात्रीच्या वेळी ड्रिल मशीनने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत असल्याने मोठा आवाज होऊन त्रास होतो. ड्रिल मशीनने खड्डे खोदण्याचे काम दिवस-रात्र सुरूच असते. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत काम बंद न केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशार सचिन काळभोर यांनी दिला आहे.
















