न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘आप्पा तांबे प्रीमियर क्रिकेट लीग’ (APL) या स्पर्धेचे भव्य व शानदार आयोजन करण्यात आले होते. रहाटणी परिसरातील सोसायट्यांसाठी देविदास तांबे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली होती, ज्यामध्ये पुरुष, महिला, मुले आणि मुलींचा समावेश होता. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच रहाटणी परिसरातील मुला-मुलींसाठी वयोगटानुसार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ९० हून अधिक सोसायटी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती: पुरुष व महिला गटासाठी: ट्रॉफी व रोख १५०००० चे बक्षिसे देण्यात आली. ही स्पर्धा मुला-मुलींसाठी पहिल्यांदाच आयोजित झाल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सर्व सहभागी खेळाडूंना आप्पा तांबे यांच्या वतीने विशेष जर्सी देण्यात आल्या. विशेष म्हणजे, कोणत्याही संघाकडून प्रवेश शुल्क घेतले गेले नाही.
सर्व सहभागी संघांना ‘श्रीमंत योगी’ ची आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. मुला-मुलींच्या सहभागामुळे पालक, आजी-आजोबा आणि संपूर्ण कुटुंबांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करत तांबे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तिच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत संपूर्ण रहाटणी परिसरात ती चर्चेचा विषय ठरली. हल्ली मुलं खेळांपासून दूर जात असल्याचे चित्र पाहायला मिळते, मात्र या स्पर्धेमुळे त्यांच्या मनात खेळाची नवी ऊर्जा संचारली. पालकांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याची मागणी केली.
विजेत्यांची नावे:
पुरुष:
1. दयाल हाइटस सोसायटी
2. साई विस्टा सोसायटी
3. रॉयल इलेगन्स सोसायटी
महिला:
1. भूमि क्षितिज सोसायटी
2. दयाल हाइटस सोसायटी
3. द्वारका क्वीन्स पार्क सोसायटी
मुली:
1. लीगसी ऑरा सोसायटी
2. ज्ञानगंगा सोसायटी
3. द्वारका क्वीन्स पार्क सोसायटी














