न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२५) :- ‘सदनिका खरेदी करुन देतो, सदनिका खरेदीसाठी कर्ज प्रकरण मंजुर करुन देतो, सदनिकेचा जीएसटी भरायचा आहे, स्टॅम्प पेपर खरेदी करायची आहे, अशी विविध करणे सांगत आरोपीने फिर्यादीकडुन ४,६७,८६२ रुपये घेतले.
ही रक्कम सदनिकेच्या मुळ मालकाला दिल्याचे भासवत सदर रक्कम स्वतःच्या फायदयाकरीता वापरुन त्याचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०५/०४/२०२४ ते दि. २७/०९/२०२४) दरम्यान रुपीनगर, तळवडे येथे घडला. ३७ वर्षीय फिर्यादीने मोईन शिकीलकर (वय ३३ वर्षे रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील घटनेचा तपास सपोनि मोटे हे करीत आहेत.










