न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२५) :- महाप्रसादाचा टेबल रस्त्यात लावल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या चौघांनी संगणमत करून फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ केली.
तसेच दुसऱ्याने त्याच्या जवळील कोयता फिर्यादीचा डोक्यात आणि दुसऱ्याने कोयता फिर्यादीच्या वडीलांच्या डोक्यात, हातावर हाणला. तसेच फिर्यादीची बहीण हिचा एकाने विनयभंग केला. हा प्रकार (दि. २३) रोजी सायंकाळी काळेवाडी येथे घडला.
अमित धरमपाल यादव यांनी आरोपी दयाशंकर सिंह, लकी दयाशंकर सिंह, कृष्णा दयाशंकर सिंह, रामा दयाशंकर सिंह (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप अटकेत नाहीत. पोउपनि मेटे पुढील तपास करीत आहेत.