न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- भोसरी-आळंदी रोड येथील बनाचा ओढा परिसरात बांगलादेशी नागरिकाचे वास्तव्य आढळले आहे. त्यानी अवैधरित्या बांगलादेश-भारत सीमेवरून घुसखोरी करून भारतामध्ये प्रवेश केला होता.
बनावट कागदपत्रे तयार करून घेऊन येथे वास्तव्य करीत शासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नयन रतन सरकार (वय २१ वर्षे, रा. बांगलादेश) उर्फ राकेश रतन सरकार (रा. घोला नादिया, पश्चिम बंगाल) उर्फ सुमित शंकर भक्ता (रा. वेस्ट बंगाल) असे आरोपीचे नाव आहे.
त्याला अटक करून त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि गुरव पुढील तपास करीत आहेत.