न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- “मी इथला गाववाला आहे, मला हप्ता दयायचा, नाहितर तुम्हाला इथे धंदा करुन देणार नाही” असे म्हणुन मोठमोठ्याने आरडाओरडा करुन दशहत माजवली. दरम्यान लव्ह मोमोजचा हातगाडा लावुन मोमोज विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला बेकायदेशिरपणे जमाव जमवुन हप्त्याची मागणी केली.
हप्ता देण्यास नकार देताच स्थानिक तरुणांनी हातातील मनगटी कड त्याच्या डोक्यात पाठीमागील बाजुस मारून गंभीर जखमी केले. शिवीगाळ दमदाटी केली.
शेजारील बर्गर विकणारा, पाणीपुरीवाला, पुस्तक विक्री करणारा यांना देखील हाताने मारहाण करुन त्यांचे सर्व साहित्य रोडवर फेकुन दिले. हातगाडयाची व खादयपदार्थ व इतर साहित्याचे नुकसान केले आहे. त्यानंतर सफेद रंगाच्या स्कॉर्पीयो गाडीमध्ये बसुन आरोपी पळुन गेले आहेत, अस फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २३) रोजी रात्रौ ०९.३० वाजताचे सुमारास फिनीक्स मॉल, वाकड येथील रोडच्या फुटपाथवर घडला. याप्रकरणी सागर अशोक शिंदे (वय-२७ वर्षे, धंदा व्यवसाय) यांनी आरोपी १) अमोल कलाटे, (वय ३८ वर्षे, रा. वाकड), २) अविनाश कलाटे (वय ४० वर्षे, रा. वाकड), ३) कौस्तुभ पवार व तीन अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही). यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी क्र. १ व २ यांना अटक केली आहे. अतुल जाधव, पोलीस उप निरीक्षक हे पुढील तपास करीत आहेत.