- हद्दपार सराईत गुन्हेगारांची अशी आहेत नावे आणि पोलीस ठाणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२५) :- गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा आणि गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी फेब्रुवारी महिन्यात पोलीसांच्या रेकॉर्डवरील तब्बल २२ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ तीन यांनी ही कारवाई केली आहे. यात २० ते ४७ वयोगटातील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. दरम्यान सन २०२४ अखेरपर्यंत १५०, जानेवारी २०२५ मध्ये १५ तर चालू वर्षी २२ असे एकूण १८७ आरोपींवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.
याशिवाय सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार १०० हुन अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे.
हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांच्या हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन माहिती द्यावी, असे आवाहन परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी नागरिकांना केले आहे.
हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आणि पोलीस ठाणे….
एमआयडीसी भोसरी (०२ वर्षाकरीता) : – शकील ख्वाजा काझी (रा. विठ्ठलनगर, भोसरी), (०१ वर्षाकरीता) :- महिला धनदेवी अर्जुन कंजारभट (रा. मोशी).
दिघी (०१ वर्षाकरीता) :- महिला नामे – शारदादेवी अरविंद चौहान (नट) (रा. वडमुखवाडी), महिला नामे निशा सत्यवान कुंभार (यमाईनगर, दिघी), महिला नामे सुनिता पारस भाट (रा.चोवीसावाडी), बालाजी राजेश बिडगर (०३ महिने) (रा. देहुफाटा, च-होली), सोपीसाप बडेसाप हवालदार (भोसरी), जयचंद नारायण इरगट (आळंदी देवाची), चिखली (०२ वर्षाकरीता) आकाश शंकर जाधव (रा. त्रिवेणीनगर, निगडी), वर्षाकरीता आशितोष नानासाहेब घोडके (रा. त्रिवेणीनगर, तळवडे), ०१ वर्षाकरीता दिगंबर काशिनाथ जामदारे (रा. चिंचवड, मुळ रा. जामखेड) दशरथ सिताराम कसबे (रा. पाटीलनगर, चिखली), चाकण ०२ वर्षाकरीता उद्धव ऊर्फ सूरज रमेश कुटे ( रा. तुकाईनगर, भोसे), उत्तमसिंग रामकुमार राठोड ( रा. भोसे), करण पांडुरंग सुरवसे (रा. महात्मा फुलेनगर, चाकण), ०१ वर्षाकरीता रोहन महेंद्र घोगरे (रा.आंबेडकरनगर, चाकण), ०२ वर्षाकरीता सुरज ऊर्फ सनी रमेश गाडेकर (रा. खंडेश्वर कॉलनी, चाकण), आळंदी ०१ वर्षाकरीता दिनेश नाना लुटे (रा.केळगाव), ६ महिने शेखर नंदकुमार शिंदे (रा. भुसेआळी, मरकळ), एका वर्षासाठी महिला नामे वंती देवीदास नानावत ऊर्फ रजपुत (रा. कोयाळी), दोन वर्षासाठी वसिम हुसेन शेख (रा. आळंदी), एका वर्षासाठी परिक्षित प्रकाश शेट्टी (रा. तुकारामनगर, तळेगाव दाभाडे).