न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सुमारे ४२ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
यामध्ये १३ टन ओला कचरा आणि २९ टन सुका कचरा संकलित करण्यात आला. तसेच शहरातील एकूण ४३ कि.मी. लांबीचा दुतर्फा रस्त्याची स्वच्छता या अभियानात करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, निगडी, थेरगाव, पिंपरी परिसरात हे अभियान संपन्न झाले.
या मोहिमेत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे दोन हजारांहून अधिक श्री सदस्यांनी सहभाग नोंदवला. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे अभियानात सहभाग घेतला.

















