न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :- निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ मधील सर्वात जुने मदनलाल धिंग्रा मैदानात विविध खेळासाठी नवीन क्रीडा संकुल उभे राहणार आहेत. त्यामुळे हे अत्याधुनिक सुविधायुक्त मिनी ऑलिम्पिक क्रीडा संकुल हौशी, उदयोन्मुख खेळाडूसाठी वरदान ठरणार आहे.
सध्या अस्तित्वात मैदानातील खेळ सुविधांमध्ये तीन बॅडमिंटन कोर्ट आहेत. तसेच जॉगिंग ट्रॅक आणि मोकळे खेळाचे मैदान, एकूण मैदानाचे क्षेत्रफळ ५.४ एकर (२२,१८८ चौ. मीटर) आहे. नवीन क्रीडा संकुल बांधण्याचा खर्च अंदाजे २३ कोटी ४० लाख रुपये असणार आहे. दोन वर्षात काम पूर्ण करण्याची महापालिका प्रशासनाची अट आहे.
तीन मजली नवीन इमारत, पार्किंग व लिफ्ट सुविधा (९१८ चौ. मी) इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सेमी ऑलिम्पिक आकाराचा अत्याधुनिक सात लेनचा डेकसह जलतरण तलाव. कार्यालय, क्रीडा वैद्यकीय केंद्र, कोच रूम, कॉन्फरन्स हॉल तसेच प्रसाधनगृह, खेळाडूसाठी चेंजिंग रूम. इमारतीच्या बाजूला मैदानात बॉक्स क्रिकेट, पिकेल बॉल व व्हॉलिबॉलसाठी मैदानाची निर्मिती.
विविध खेळाच्या आधुनिक सुविधांसह मदनलाल धिंग्रा मैदानातील नवीन क्रीडा संकुलाची निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच कामास सुरुवात होणार आहे.
– मनोज सेठिया, सह शहर अभियंता, स्थापत्य, उद्यान / क्रीडा, महापालिका…














