- पिंपळे निलख स्वच्छ आणि सुंदर होतंय – रविराज काळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :- पिंपळे निलख प्रभागाची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जागोजागी कचऱ्याची समस्या डोक वर काढत होती. याचाच परिणाम म्हणून अनेक सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहू लागले. प्रभागाच्या सौंदर्याला बाधा पोहोचू लागली.
दरम्यान ‘आप’चे रविराज काळे यांनी मार्ग काढत एक शक्कल लढवली. ज्या ज्या ठिकाणी असा कचरा जमा होतो अशा ठिकाणी सेल्फी पॉईंट उभे करायचे, ती जागा सुशोभित करायची.
शहरात काही ठिकाणी पालिका प्रशासनाने हा उपक्रम राबविला होता. परंतु, प्रभागात हे शिवधनुष पेलणे सोपी गोष्ट नव्हती. रविराज काळे यांनी पालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक खंडेराव बलकवडे, योगेश फल्ले, उपआरोग्य निरीक्षक शंकर घाटे यांच्या सहकार्याने प्रभागातील क्रांती चौकात या क्रांतीकारी निर्णयाची पहिली मुर्तमेढ रोवली. पुढे ही कल्पना प्रभागात अनेक ठिकाणी रुजवू, अशी घोषणा रविराज काळे यांनी केली.














