न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :- महापालिकेच्या वतीने जापनीज मेंदूज्वर (Japanese Encephalitis – JE) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १५ वयोगटातील बालकांसाठी १ मार्च २०२५ पासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत अवघ्या तीन दिवसांत ३५ हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये प्रभावीपणे राबविली जात आहे. शहरातील सर्व मुलांचे शालेय व समाजस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. पालक या मोहिमेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत.
रुग्णालयाचे नाव आणि लसीकरण झालेल्या बालकांची संख्या…
आकुर्डी रुग्णालय – ६ हजार २८९
भोसरी रुग्णालय – ५ हजार ३०४
जिजामाता रुग्णालय – ३ हजार २३६
सांगवी रुग्णालय – ४ हजार ५३०
तालेरा रुग्णालय – ४ हजार ७२४
थेरगाव रुग्णालय – २ हजार८०६
यमुनानगर रुग्णालय – ५ हजार ७७८
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय – २ हजार ३६३
‘जेई’ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस पिंपरी चिंचवड शहरातील सहकार्य करून आपल्या पाल्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. या मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व मुलांचे शालेय स्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरातील १ ते १५ वयोगटातील पाल्याला ही लस घेऊ द्यावी.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका..














