न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील महिला आरोपीला पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नंदा विलास बोत्रे (वय ५४ वर्षे, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) असे महिलेचे नाव आहे. केसची सुनावणी ए.ए.घानीवाल, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, खेड यांच्या कोर्टामध्ये चालु होती.
एकुण १,९०,५०० रु. किं. चा माल त्यामध्ये ०३ किलो ८१० ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यातून जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोउपनि जायभाये यांनी केला होता.
ही कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, विशाल हिरे सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, बाळासाहेब कोपनर सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक जायभाये, पोलीस उप निरीक्षक राजन महाडीक, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, राजेंद्र बांबळे, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, सुर्यकांत पवार यांनी केली आहे.













