न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- चिखली कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या पूररेषेतील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. निळ्या पूररेषेतील अतिक्रमणे लवकरच हटविण्यात येणार आहेत.
महापालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने पूरसदृशस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नद्या, ओढा व नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहेत.
पुराच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील सर्व पत्राशेड, बांधकामे पाडण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. लवकरच कारवाईला सुरूवात करण्यात येणार आहे.
– मनोज लोणकर, उपायुक्त, महापालिका…














