न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ११ मार्च २०२५) :- ‘मी महाळुंगे गावचा भाई आहे. यापुढे तु महाळुंगे गावामध्ये अंडे विकायचे नाही. जर तुला अंडे विकायचे असतील तर ५००० रुपये महिना मला हप्ता दयावा लागेल’ अशी धमकी देत कारमधुन लोखंडी कोयता बाहेर काढला. कोयत्याचा धाक दाखवुन ‘तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? तुला जर अंडे विकायचे असतील तर मला हप्ता दयावा लागेल, असे फिर्यादी चालकाला म्हणाला. त्यावेळी आजुबाजुचे लोक फिर्यादीच्या मदतीसाठी जमा झाले. आरोपीने लोखंडी कोयता हवेत फिरवुन कोणीमध्ये आले तर कापुन टाकीन, असे म्हणुन दहशत निर्माण केली. लोक घाबरुन पळुन गेले.
तसेच व्हॉटसअॅपवर कॉल करुन ‘तु जर परत महाळुंगे गावामध्ये आला तर, तुला मारुन टाकीन तसेच तुझी गाडी सुध्दा फोडुन टाकीन, अशी धमकी दिली, अस फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०६) ते (दि. ०८) दरम्यान वाय कॉर्नर जवळ, महाळुंगे ता. खेड जि. पुणे येथे घडला. आशिष सोनुने (वय ४२ वर्षे, धंदा ड्रायव्हर) यांनी आरोपी
अजय गायकवाड (वय २७ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काळे पुढील तपास करीत आहेत.
















