- ऑनलाइन मनी फ्रॉड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- इस्टंट पे, एअरपे, स्पाईसमनी या फिनटेक कंपन्यांचा वापर करुन सायबर फ्रॉड करणा-या रॅकेटमधील एअर पे च्या कर्मचा-यासह ०६ आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर पोलीसांनी अटक केली आहे.
१) नरेश सुजाराम चौधरी व्यवसाय झेरॉक्स शॉप, रा. घाटकोपर ईस्ट, मुंबई. २) जिलानी जानी शेख, व्यवसाय फॅब्रिकेशन रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई. ३) अमित बड्डुलाल साहु व्यवसाय ऑनलाईन मनी ट्रान्सफर रा. उरण ४) इरफान खलील शेख व्यवसाय ऑनलाईन मनी ट्रान्सफर, रा. बंदर रोड, पनवेल. ५) किरण वासुदेव जेठनानी व्यवसाय कपडे विक्री व ऑनलाईन मनी ट्रान्सफर रा. टिळकरोड, पनवेल. ६) मकरंन्द संजीव विळेगावकर, व्यवसाय – एरिया सेल्स मॅनेजर एअरपे कंपनी रा. आकुर्ली पनवेल ईस्ट अशी दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ऑनलाईन ट्रेडींग करण्यासंदर्भात व्हॉट्सअप ग्रुपवर कोणत्याही माहितीशिवाय त्यामधील ग्रुपचे ग्रुप अॅडमीनने फिर्यादीस अॅड केले होते. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना आदित्य बिर्ला यांचे Ad-bir capable नावाचे अॅप असुन त्यामध्ये त्यांचे सांगण्याप्रमाणे गुंतवणुक केल्यास खुप मोठ्या प्रमाणावर नफा मिळवुन देण्याचे अमीष व खात्री देत लिंकद्वारे अॅप डाऊलोड करण्यास सांगुन स्टॉक्सच्यै नावाखाली बॅक अकाऊंटमध्ये एकुण २,८०,४३२/- रुपये भरण्यास भाग पाडले. या रकमेचा अपहार करुन फिर्यादीची कोणतीही रक्कम परत न करता आर्थिक फसवणुक केली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे गुन्हा दाखल होता.
दाखल गुन्हयाचे तपास करीत असताना गुन्हयातील फसवणुकीची रक्कम आयडीबीआय बँकेच्या अकाऊंटला ट्रान्सपर झाल्याची माहीती प्राप्त झाली होती. अकाऊंटची माहीती घेतली असता सदरचे अकाऊंट इन्फिनिटी इंटरप्रायझेस या नावाने असुन ते पनवेल येथिल असल्याची माहीती प्राप्त झाली. तसेच सदर अकाऊंटचे स्टेटमेंट चेक केले असता त्यावर मोठ मोठ्या रकमेचे ट्रान्झेक्शन झाल्याचे दिसुन आले. तसेच सदर अकाऊंट वरुन एयू स्मॉल फायनन्स बँकेच्या तसेच अॅक्सीस बँकचे सिध्दी टेलिकॉम या अकाऊंटला पैसे ट्रान्सपर झाल्याचे दिसुन आले. एयु चे खाते नरेश सुजाराम चौधरी रा. घाटकोपर ईस्ट, मुंबई. याचे नावावर असल्याची माहीती मिळाली त्यावरुन नरेश चौधरी याचेकडे तपास करता त्याने सदर अकाऊंटवर संजय नावाचे इसमाने पैसे पाठवले असल्याचे व ती रक्कम रोख स्वरुपात काढुन पाहीजे आरोपी नाथु यास कमिशनवर देत असल्याचे सांगितले. तसेच इन्फिनिटी नावाचे बैंक अकाऊंट मधुनही नरेश चौधरी याने अकाऊंटमध्ये वेळोवेळी रक्कम घेतल्याचे दिसुन येत आहे. त्यानंतर नरेश चौधरी याच्याकडे तपास केला असता त्याने नाथु याच्या सांगणेवरुन जिलानी जानी शेख याच्याकडुन ८० लाख रुपये नाथु याच्या एअरपेच्या अकाऊंटला घेऊन ते त्याला रोख स्वरुपात काढुन दिले असल्याची माहीती मिळाली तसेच अटक आरोपी अमित साहु रा.उरण हा अपना मुद्रा नावाने मनी ट्रान्सफर नावाने व्यवसाय करुन त्याकरीता त्याचे सिध्दी टेलिकॉम नावाचे खात्यावर पाहिजे आरोपी नाथु याचेकडुन मोठया स्वरुपात रक्कम घेत असल्याचे दिसुन आले. त्यानंतर सदर गुन्हयात मोठ्या प्रमाणात पैश्याची अफरातफर झाल्याची दिसुन येत असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सदर गुन्हयाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर सदर गुन्हयाची चौकशी केली असता यातील आरोपी यांनी Airpay, Instant pay, pay world, Spicemoney अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करुन त्याव्दारे मास्टर डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर असे अकाऊंट तयार करत असे. वेगवेगळ्या सायबर गुन्हयातील रक्कम ही म्युल अकाऊंट मार्फत इन्फिनिटी एंटरप्रायझेस अंकाउटवर घेवुन त्यानंतर वरील फिनटेक कंपनीच्या नोडल अकाऊंटवर जमा करत असे. त्यानंतर जमा केलेली रक्कम क्रेडीट पॉईटव्दारे रिटेलर अकाऊंटवर घेऊन ते पॉईंट सी.एम.एस इन्फोटेक कंपनीच्या नावे परत एअरपे मार्फत जमा करत असे. सदर पॉईटच्या बदल्यात सी.एम.एस इन्फोटेक कंपनीकडे जमा होणारी रोख रक्कम पाहिजे आरोपी नाथु हा घेऊन ती आंगडीया मार्फत पाठवुन होता.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोउपनिरी वैभव पाटील, पोउनिरी प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार दिपक भोसले, सुभाष पाटील, विशाल निचीत, स्वप्नील खणसे, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, महेश मोटकर, सुरज शिंदे, सौरभ घाटे, दिपक माने दिपाली चव्हाण सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
सर्व नागरिकांना आवाहन…
ऑनलाईन मनी ट्रान्सफर करीता मास्टर डिस्ट्रीब्युटर शिप, सुपर डिस्ट्रीब्युटर शिप, रिटेलर आयडी बनवणेकरीता आपलेकडील केवायसी डॉक्युमेंटस घेवुन त्याद्वारे आपले नावे ऑनलाईन मनी ट्रान्सफर आयडी तयार करण्यात येवुन त्याद्वारे मोठया स्वरुपात आर्थिक व्यवहार आपले नावे करण्यात येवुन आपली फसवणुक होवु शकते. त्याकरीता सर्वानी अशा प्रकारच्या व्यक्तीपासुन सावध रहावे.


















