न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- क्रेन चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून वाकड येथील जग्वार शोरुमच्या गेटला धडक दिली. त्यामुळे शोरुमच्या केबिनचे नुकसान झाले आहे.
दरम्यान तिथे सुरक्षारक्षक ड्युटी करीत होते. त्यांच्या खांदयाच्या हाडास व डोक्यास मार लागुन ते जखमी झाले आहेत. हा प्रकार (दि. ०८) सायंकाळी ५.२० च्या सुमारास घडला.
याप्रकरणी वॉचमेन गोरक्षनाथ साळवे यांनी क्रेन चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











