‘वाहन मुक्त’ दिवस साजरा करण्यासाठी पंधरा लाखांची उधळपट्टी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) पहिल्यांदाच वाहनमुक्त दिवस शनिवार व रविवार दि. ८ व ९ मार्च
पिंपरी मार्केट परिसरात, साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक दरम्यान राबवला.
वाढत्या वाहनसंख्येमुळे, चालणे, सायकल चालवणे आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या पर्यायी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी एकूण र.रु.१४,८०,०००/- इतका खर्च झाला आहे. त्यास पालिका आयुक्तांनी सभेत मंजुरी दिली आहे.
यात मनोरंजन, लाईव्ह अर्किस्ट्रा, खेळ रंगल पैठणीचा, डान्स इंडीया डान्स’ यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहभाग होता. त्यासाठी ९,८०,००० आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी चहापान / अल्पोपहार कार्यक्रमाचे प्रमाणपत्र आणि पोस्टर प्रिंटिंग, फ्लेक्स आणि स्टेंडीज प्रिंटिंग, टोप्या, बंच, फोटो बूथ, रांगोळी, फुगे, इ. व्यवस्था करण्यासाठी र.रु.५ लाख अधिक कर असा एकूण १४,८०,०००/- इतका खर्च आला आहे.


















