न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२५) :-निगडी येथे असलेल्या अपर तहसील कार्यालयाची जागा अपुरी ठरत आहे. दस्तऐवज साठविण्यासाठी आणि कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी नवीन जागेची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे चिखलीसह रावेत येथे पीएमआरडीएच्या जागेत कार्यालयाच्या जागेसाठी चाचपणी सुरु आहे.
चिखली येथील पाच एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, अद्याप त्या प्रस्तावावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. २०१८ पासून हा प्रस्ताव धुळखात पडून आहे. याशिवाय, रावेत येथील निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या गोडाऊनच्या जागेचा देखील तहसील कार्यालयासाठी वापर करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुसज अपर तहसील कार्यालयासाठी योग्य जागेचा शोध घेतला जात आहे. चिखली येथील जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच, रावेत येथील गोडाऊनच्या जागेचा तहसील कार्यालयासाठी वापर करण्याचा विचार सुरू होता. मात्र, हे गोडावून निवडणूक विभागाला देण्यात आले आहे.
– जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी चिंचवड…


















