- जिल्हाधिकारी कार्यालयाची पत्र पाठवून नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२५) :- महापालिकेच्या विविध विभागात मराठी भाषेचा वापर होत नाही, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार शाखेचे उपजिल्हाधिकारी रा. शि. भोसले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र पाठविले आहे.
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मध्ये सन २०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १४ नुसार जिल्हाधिकारी यांना जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष तयार करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेच्या वापराबाबत अंमलबाजावणी करणे अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारात मराठी भाषेचा वापर होत नसल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे.


















