न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :-बीआरटी मधुन आलेल्या वाहनचालकाने रहदारीच्या नियमांकडे दुलर्क्ष करुन रिक्षाला समोरुन जोरात धडक दिली. त्यात रिक्षातील महिला फिर्यादी गंभीर जखमी झाली असून रिक्षा चालकाचा मृत्यु झाला आहे. रिक्षाचेही नुकसान झाले आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी दुपारी १२.३० वाचे सुमा. जगताप डेअरी ते शिवार गार्डन चौक दरम्यान स्पॉट १८ मॉलसमोर रहाटणी येथे घडला.
याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी चारचाकी गाडी नं. एमएच/१४/एलपी/७५८५ वरील चालक (पुर्ण नाव पत्त माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
काळेवाडी पोलिसांनी आरोपी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुजावर घटनेचा तपास करीत आहे.















