न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- लिलावामधील अशोक लेलॅन्ड, टाटा ट्रक, आयशर, दुचाकी अशी वाहने ३७ लाख रुपये किंमतीस खरेदी करुन देण्याचे दोघांनी व्यावसायिकाला अमिष दाखवले.
हिंदूजा सातारा व इंडसइंड बँक सातारा व जालनाचे बनावट कोटेशन व रिसीट तयार करुन ते फिर्यादी यांना व्हॉटस्अपव्दारे पाठवले. त्यांच्याकडून २० लाख रुपये कॉसमॉस बँकेच्या शाखेतुन स्वतःच्या स्टेट बँक सातारा यावरुन वर्ग करुन घेतले.
फिर्यादी यांना ठरल्याप्रमाणे वरील वाहने खरेदी करुन देण्याचा व्यवहार पूर्ण केला नाही. आरोपी यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन फिर्यादी यांची २० लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार पुना फोर्ज, एमआयडीसी भोसरी येथे घडला. अनिल जावळेकर यांनी आरोपी १) नितीन भानुदास काळे, २) राहूल सिध्दार्थ मोरे या दोघांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पठारे पुढील तपास करीत आहेत.


















