न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२५) :- राज्य शासनाने तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी ६६ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरु आहेत.
या विकासकामांची पाहणी संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १९) केली. यावेळी कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी. उपाध्यक्ष पोपट पिंगळे, व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, आप्पा शेलार, प्रदीप उबाळे आदी उपस्थित होते.
या विकास आराखड्या अंतर्गत मंदिर आवारात सभा मंडप उभारणी, प्रशासकीय इमारत, दगडी आच्छादन असलेले संग्रहालय, भक्त निवास आदींच्या कामांना सुरुवात झाली आहे. दरम्यान मंदिर परिसरात ९ मीटर प्रशस्त रस्त्याच्या कामाला देखील प्रारंभ झाला आहे. त्याची पाहणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच विकास आराखड्यातील कामांना गती देण्याची सूचना अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केली असल्याची माहिती व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांनी दिली.















