न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- आयआयबीएम कॉलेज चिखली येथे (दि.18) रोजी भव्य दिव्य असा फूड फेस्टिवल साजरा करण्यात आला. सध्या एव्हिएशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, या दृष्टिकोनातून यावर्षी INFLIGHT FLAVOURS – FOOD FESTIVAL मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद बी. तेलंग इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्राचार्य डॉ. अजयकुमार राय, चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साळुंखे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, बीजेपी महिला शहर कार्यकारिणी शितलताई वर्णेकर, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, विभागप्रमुख अनिकेत वंजारी, प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ, मा. नगरसेवक संतोष मोरे, कॉलेजचे विद्यार्थी, पालक, 100 हून अधिक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील प्राचार्य, पंचतारांकित हॉटेलचे HR मॅनेजर्स, चिखली विभागातील नागरिक असे 1500 हुन अधिक उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आली.
कार्यक्रमामध्ये विविध जिल्ह्यातील विद्यालय, कॉलेज मधील 100 हून अधिक प्राचार्य यांचा गौरव सत्कार समारंभ तसेच 20 हून अधिक पंचतारांकित हॉटेलमधील HR मॅनेजर यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
आय आय बी एम कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट, एअरपोर्ट मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, क्रुझ मॅनेजमेंट असे शिक्षण दिले जात असून अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणजेच हा फूड फेस्टिवल. विद्यार्थ्यांना बिझनेस कसा करावा, बिझनेस करताना इन्व्हेस्टमेंट, विक्री, नफा, तोटा या गोष्टीचा अनुभव यावा, यासाठी विद्यार्थ्याच्या उद्योजकता विकासासाठी 25 पेक्षा अधिक भारतीय तसेच विदेशामध्ये सुप्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ स्वतः बनवून प्रमुख पाहुणे तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासाठी स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आले. तसेच कार्यक्रमांमध्ये मनोरंजन, नृत्य, लाइट्स, डीजे व प्रमुख पाहुणे, प्राचार्य, हॉटेलचे अधिकारी, विद्यार्थी सर्वांची जेवनाचीही सुविधा याचेही आयोजन असल्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांनी संस्थेच्या 18 वर्षातील प्रगतीचा व कार्याचा आढावा सर्व प्रमुख पाहुणे, पालक यांना सांगून फेस्टिवल बाबत विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व स्टॉलचे ओपनिंग केले. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे डॉ. अजयकुमार राय यांनी हॉटेल व पर्यटन व्यवस्थापनाचे करियरसाठी असणारे महत्त्व अधोरेखित करून संस्थेचे व कार्यक्रमाचे कौतुक केले. डायरेक्टर शितलताई वर्णेकर यांनी या फेस्टिवलचे नियोजन पाहून संस्थेतील सर्व अधिकारी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य प्रदीप फुलकर यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या तज्ञ मनुष्यबळाची गरज अधोरेखित करून मान्यवरांचे आभार मानले. विभागप्रमुख अमोल भागवत यांनी महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ग्रामीण भागातून विद्यार्थी आजआयबीएम संस्थेमध्ये मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी येत आहेत, आजतागायात भरपूर विद्यार्थी परदेशामध्ये स्वतःच्या पायावर उभे आहेत व पुढेही मोठ्या संख्येने विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे संबोधले आणि उपस्थित प्राचार्य, प्रमुख पाहुणे यांचे आभार मानले.
प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ यांनी विद्यार्थ्यानी केलेल्या महनतीचे कौतुक करून आज हॉटेल व्यवस्थापन, हवाई क्षेत्र, पर्यटन क्षेत्र यामध्ये मोठमोठ्या पदावर आज आयआयबीएम चे विद्यार्थी, विद्यार्थिनी काम करत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे, असे सांगितले व आई-वडिलांचे नाव उज्वल केलं पाहिजे, असे बोलून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला व शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग तसेच हॉटेल व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याना वेगवेगळ्या संधींची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, असा हा भव्य दिव्य फुल फेस्टिवल विद्यापीठाचा अभ्यासक्रमाचा एक भाग असून भारतात व परदेशात विद्यार्थी व्यावसायिक बनले पाहिजेत, या उद्देशाने हा फेस्टिवल भरवण्यात आला.
कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन आणि नियोजन सर्व प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय वर्ग व विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या जबाबदारी घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले व आभार प्रदर्शन विभागप्रमुख अनिकेत वंजारी आणि प्रशासकीय प्रमुख प्रतिक्षा डफळ यांनी करून कार्यक्रम संपन्न झाला.











