- दोन प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :-तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
दरम्यान महापालिकेच्या दोन प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. तर एका प्रशासन अधिकाऱ्याला पिंपरी महापालिकेतच सहायक आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेशनगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी गुरुवारी (दि.२०) जारी केला आहे.
महापालिकेच्या प्रशासन विभागात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किरणकुमार मोरे यांची सोलापूर महापालिकेत उपायुक्त, सुचिता पानसरे यांची अमरावती महापालिकेत उपायुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. तर प्रशासन अधिकारी अमित पंडित यांना सहायक आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतच पदोन्नती देण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेशात नमुद आहे.











