न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- वाकड परिसरातील ग्लोरिया सॉफ्टवेअर पार्क या कंपनीच्या जागेत टोळक्याने ओरडा ओरडा करीत गुरूवारी दुपारच्या सुमारास प्रवेश केला.
दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने तेथील तिघांना शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी पाईप व लाकडी बांबू त्यांच्या दिशेने उगारून त्यांना मारण्याची भिती दाखवुन मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. जागेला असलेल्या पत्र्याच्या कंपाऊडची तोडफोड करून तिथे असलेल्या पाण्याचे कॅन व इतर वस्तु यांची नासधूस केली, असं फिर्यादीत नमुद आहे.
याप्रकरणी महेद्र सोनावणे यांनी आरोपी (१) किशोर वसंत साळवी, (२) बबलू वाघमारे, (३) शैलेश वाघमारे, (४) रूपेश वाघमारे, (५) कुणाल वाघमारे, (६) दिलीप वाघमारे यांच्यासहीत महिला व तिच्यासोबत असणा-या चार ते पाच अनोळखी महिला यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
वाकड पोलीसांनी वरील सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप अटकेत नाहीत. प्रसाद गज्जेवार, सपोनिरी वाकड पोलीस स्टेशन हे पुढील तपास करीत आहेत.















