न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२५) :- सांगवीतुन बेपत्ता झालेल्या 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला आहे. मानसी गोविंदपुरकर असे तीचे नाव आहे.
शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने गुरुवारी घेरेवाडी परिसरातील झाडाझुडपांमधून तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मंगळवारी सकाळी मानसी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, ती घरी परतलीच नाही. नंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, ती एका टॅक्सीतून एकटीच लोहगड किल्ल्यावर गेली होती. माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. तिचा मोबाईल शेवटचा लोहगड परिसरात असल्याचे आढळून आला होता.











