न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२५) :- हिंजवडीतील विनोदे वस्ती परिसरातील अतिथी लॉजिंग नावाच्या लॉजमध्ये वेशा व्यवसाय चालवल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एक पिडीत महिला व अल्पवयीन मुलगी यांची या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली आहे.
जवळच लहान मुलांची शाळा हे सार्वजनिक ठिकाण असताना देखील त्यांनी हे कृत्य केले आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे पोहवा मारुती करचुंडे यांनी आरोपी १) युवराज राजेंद्र पाटील (लॉज मॅनेजर), २) प्रवीण बळीराम असटकर (लॉज चालक-मालक), ३) राहुल चव्हाण ऊर्फ अमीत यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. पोउपनि ताकतोडे पुढील तपास करीत आहेत.











