न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- दुरिस्ट व्हिसाची मुदत संपली असतानाही महिलेसह विधीसंघर्षीत बालक या दोघांनी भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल.
उत्तर प्रदेश येथील नागरिकाला ते बांगलादेशी नागरिक आहेत हे माहीती असुनही त्यांना आश्रय देवुन त्यांचेबाबत कोणाला काही माहीती समजु नये याकरीता त्यांचा पासपोर्ट जाळुन नष्ट केला. तसेच त्याने या बांग्लादेशी महिलेबरोबर विवाह केला. त्यातुन बालक वय १ वर्ष ३ महिने हा मुलगा त्यांना झाला.
त्यांनी आपआपसात संगणमत करुन बनावट कागदपत्राच्या सहाय्याने भारतातील आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणुक ओळखपत्र अशी कागदपत्रे बनवून घेऊन त्याच्या आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवत आले आहेत.
हा प्रकार दि.०७/०४/२०२२ ते दि.२७/०३/२०२५ दरम्यान रविरंजन काट्याजवळ, देहु आळंदी रोड, कुदळवाडी, चिखली येथे घडला.
याप्रकरणी १) महिला आरोपी (वय ३० वर्षे, मुळ गाव वेस्ट धरमगंज, फतुल्लाह अनायतनगर, नारायणगंज देश बांग्लादेश), २) मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (वय ३३ वर्षे राह. मुळ राह मक्दुलनगर, गोला अवादी, अलिगड, राज्य उत्तरप्रदेश) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक याच्या विरोधात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. चिखली पोलीसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. सपोनि गोमारे पुढील तपास करीत आहेत.











