न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- देहूगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रधान प्रसंगावरील शिल्प साकारणार असून देहूच्या वैभवात आणखीन एक भर पडणार आहे.
आ. सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनातून आणि देहूच्या प्रथम नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुमारे बावीस लाख रुपये प्रस्तावित खर्च असलेल्या या उत्तीत शिल्पासाठी देहूनगर पंचायतीच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या संकल्पाचे उद्घाटन बुधवार (दि. २७) देहूच्या प्रथम नगराध्यक्षा स्मिता चव्हाण आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शैलेंद्र चव्हाण, संतोष चव्हाण, प्रमोद चव्हाण, चंद्रगुप्त शिरोळे, राजेंद्र लगाडे, अक्षय भोसले, बाप्पू चव्हाण आदी उपस्थित होते.
संविधान प्रधान प्रसंगावरील या उत्तीत शिल्पाची उंची दहा फूट असून, त्यामागे १३ ×१६ ची भिंत तसेच लॉन, बसण्यास बाकडे, एलएडी लाईट तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधानाची प्रत प्रधान भव्य प्रसंग शिल्पातून साकारला जाणार आहे.











