- आ. अण्णा बनसोडे यांना कॅबिनेट दर्जा दिल्याने मित्रपक्षांची भुई उंचावली?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२५) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आ. बनसोडे यांना मोठे पद दिल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्याची तयारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभेच्या २२ व्या उपाध्यक्षपदी आ. बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आ. बनथोडे हे उपमुख्यमंत्री तथा
पालकमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. अजित पवार हे कोणत्याही पेचप्रसंगात सापडल्यास बनसोडे हे त्यांच्या सोबत कायम असतात. राष्ट्रवादी एकत्र असतानाही ते अजित पवारांसोबतच होते.
अजित पवार यांनी मागासवर्गीय आमदार बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष करून सोशल इंजिनिअरींगचे समीकरण साथले आहे. आगामी महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढल्या जाणार आहेत.
महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे.
त्याचाच भाग म्हणून माजी महापौर तसेच, नगरसेवक योगेश बहल यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुकी केली आहे. त्यांनी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मोट बांधून संघटन वाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीत पाहावयास मिळत आहे.
शहरात भाजपचे चार आमदार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बनसोडे एकमेव आमदार आहेत. त्यांना ताकद देण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या गळ्यात राज्यमंत्र्यांचा दजां असलेल्या उपाध्यक्षपदाची माळ घातली आहे. त्या माध्यमातून शहराच्या नेतृत्वाची कमान त्यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे शहरात पक्षाला नवीन ऊर्जा मिळाली आहे. या नेतृत्वाखाली आगामी महापालिकेत भाजपला शह देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्याचे दिसत आहे.











