न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२५) :- संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्तांची निवडणूक प्रक्रिया सोमवारी होणार आहे. येथील पित्ती धर्मशाळेत ही प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच, सोमवारीच मतमोजणी होणार आहे, अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.
संस्थानच्या आबाजीबुवा, गणेशबुवा आणि गोविंदबुवा अशा तीन शाखेतून प्रत्येकी दोन असे सहा विश्वस्त निवडले जाणार आहेत. तर, प्रत्येक शाखेतून दोन वर्षासाठी एक अध्यक्ष निवडला जाणार आहे. निवडून आलेले सहा विश्वस्त आणि प्रत्येक दोन वर्षांनी निवडला जाणारा अध्यक्ष हे पुढील सहा वर्षे देवस्थानचा कारभार सांभाळणार आहेत.











