न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२५) :- क्रिक बस या सोशल मिडीयाच्या आधारे आय.पी.एलच्या सन राईज हैद्राबाद विरुध्द लखनऊ सुपर जाईंट या २०-२० क्रिकेट मॅचवर बेटींग खेळत व खेळवत असताना तिघेजण मिळुन आले.
ही कारवाई (दि.२७) रात्री ११.४९ वा. सुमारास समृध्दी हॉटेल व बार, काटे पिंपळे रोड, नव महाराष्ट्र स्कुलच्या मागे, पिंपरी येथे पोलीसांनी केली.
कारवाईत महिला आरोपी, ओम हरीष मुलचंदानी (वय २६ वर्षे, रा. वाघेरे पार्क, पिंपरी), नरु तोलानी यांच्या विरोधात गुंडा विरोधी पथकाने दिलेल्या तक्रारीनुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि देशमुख पुढील तपास करीत आहेत.