न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२५) :- महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरातील ग्रामीण भागात शेती व नविन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग मार्फत उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी व औद्योगिक वसाहतींचे मोठया प्रमाणात नुकसान होत होते. तसेच परिसरात अंधार निर्माण होवुन इतर गुन्हे घडण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने धडाकेबाज कामगिरी करीत एमआयडीसी परिसरामध्ये रोहित्र (ट्रान्सफार्मर) चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराकडुन ०९ गुन्हे उघडकीस आणुन एकुण २,३०,२४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहित तेजबहादुर सिंग, वय २७ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे मुळगाव पतजु पहाडपुर, ता. कादीपुर, जि. सुलतानपुर जि. उत्तरप्रदेश, आकाश अखिलेश चौबे, वय २५ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे मुळगाव साडी जगदिशपुर ता. कादीपुर, जि. सुलतान, उत्तरप्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत.
विद्युत रोहित्र चोरीची ठिकाणे ही ग्रामीण व दुर्गम भागातील तसेच निर्माणधिन औदयोगिक वसाहतीचे निर्जन ठिकाणी होते. तसेच घटना पाहणारे कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळुन येत नसल्याने रोहित्र चोरणारे चोरट्यांचा शोध घेण्यामध्ये तपास पथकांना अडचणी येत होत्या. रोहित्र चोरीचे कालावधी, वार, वेळ यांचा बारकाईने अभ्यास करुन परिसरात संशयीतरित्या वावरणारे लोकांची माहिती प्राप्त केली. चोरी बाबत घटनास्थळाचे आजुबाजुचे मार्गावरील सीसीटिव्ही प्राप्त करुन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीत व्यक्तींना ताब्यात घेत कसुन तपास करता त्यांनी विद्युत रोहित्र मधील तांब्यांचे तारा चोरल्याची कबुली दिली. आरोपी यांचेकडुन विद्युत रोहित्रामधील तांब्याचे तारा व पट्टया, रोहित्र खोलण्यासाठी वापरलेले साहित्य-लहान मोठ्या आकाराचे पान्हे इ. तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३. डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नितिन गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रविण कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सपोफौ राजेंद्र मोरे, राजु जाधव, राजु कोणकेरी, पोहवा अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर सांगळे, गोरक गाडीलकर, प्रकाश नवले, शिवाजी दिघे, पोना संतोष काळे, प्रशांत ठोंबरे पोकों/ शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, राजेंद्र गिरी, शरद खैरे यांनी केली आहे.