न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली.
डांगे चौक येथे २० दुकानांची तपासणी केली असता कचरा टाकल्याबद्दल एका नागरिकांकडून ५०० रुपये व एक बियर शॉपी कडून नॉनवोवन बॅग्ज एक किलो व ५० प्लास्टिक ग्लास आढळल्याने जप्त करुन त्यांना पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
ही कारवाई सोमवारी (दि. २०) रोजी प्रभाग क्रमांक २४ डांगे चौक येथे करण्यात आली. या कारवाईत आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी व मुख्य आरोग्य निरीक्ष राजीव बेद व आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल व पथकाने केली.











