न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२५ ) :- ३१ वर्षीय विवाहितेने सासरच्या शारिरीक, मानसिक छळाला व त्रासाला कंटाळुन राहत्या घरामध्ये मुलाच्या झोक्याला असलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
हा प्रकार विजयनगर, काळेवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी महिलेने मयत विवाहितेचा पती रॉन पंडीत केदार, २ सासु, ३ सासरा पंडीत अर्जुन केदार, ४ नणंद, ५ दिर राहुल पंडीत केदार, ६ रामदास दगडु साळवे, ७ महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. त्यावरून काळेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मसपोनि कोरडे पुढील तपास करीत आहेत.














