न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२५ ) :- चाकण येथील चक्रेश्वर रोडवरील साई प्लाझा या नावाने स्किम करत असल्याचा प्लॅन दाखवुन त्यासाठी रक्कम स्विकारून संगनमत करीत फ्लॅटचा ताबा न देता एकाची आर्थिक फसवणूक केली आहे.
स्किम मधील एक वन बिएचके व एक टु बिएचके असे दोन फ्लॅट विक्री करून सदर फ्लॅट खरेदीचे २१ लाख ५० हजार रुपये चौघांनी फिर्यादीकडून घेतले होते. त्यासाठी फ्लॅट खरेदीचे अँग्रीमेट प्रमाणे दोन वर्षात ताबा देतो असे लिहुन देवुनही प्रत्यक्षात फिर्यादी यांना अदयापपर्यंत फ्लॅटचा ताबा न देता फिर्यादी यांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमुद आहे.
धीरज शांतीलाल ओस्तवाल यांनी आरोपी १) सतिष केशव सोनवणे, २) केशव विठ्ठल सोनवणे, ३) विजय ज्ञानोबा मोरे, ४) रोशन जैन यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. त्यावरून चाकण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सपोनि धायगुडे पुढील तपास करीत आहेत.












