- अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२५ ) :- पिंपरी-चिंचवड शहराला ऐन उन्हाळ्यात गुरूवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. शहरातील विविध भागात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
अवकाळी पावसामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळे सौदागर, वाकड परिसरात विजांच्या गड़गडाटासह जोराचा पाऊस पडला. त्यामुळे आठवडाभरापासुन सुरु असलेल्या उष्ण आणि दमट हवामानात गारवा पसरल्यामुळे नागरिकांची उष्णतेपासुन काहीकाळ सुटका झाली.
शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर दुपारी वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.















