न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२५) :- अज्ञात कारणासाठी ४५ वर्षीय व्यक्तीला कशाच्यातरी सहाय्याने ठार मारुन मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी गळ्यापासून वरचा शरीराचा भाग कुठेतरी टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान उर्वरित मृतदेह खाणीत टाकला आहे. ही घटना (दि.२९/०३/२०२५ ते दि.०२/०४/२०२५) कानिफनाथ खडीमशीन समोरील खदाणी/खान मोशी येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. दिघी पोलीसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि गुन्हे पाटील हे पुढील तपास करीत आहेत.












