न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२५) :- दुकानामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता RELAXO FOOTWEAR LIMITED कंपनीचे स्वामीत्व असलेल्या त्याच नावाचे व चिन्हाचे बनावट शुज व चप्पलची विक्री करीत असताना व एकुण १,३२,८९३/- रु किं चा माल विक्री करीता ठेवला असताना मिळून आला आहे.
हा प्रकार (दि. ०३) रोजी सायंकाळी १२/३० वा चे सुमारास फिनोलेक्स केबल कंपनीसमोर, मोरवाडी, पिंपरी येथील सेवन स्टार शुज फुटवेअर येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सर्फराज अब्दुल रौफ तांबोळी यांनी आरोपी शमशाद इसरार खान (वय. ३७ वर्षे) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अद्याप अटकेत नाही. घटनेचा तपास धनंजय कापर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे करीत आहेत.












