न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- शिवशाही व्यापारीसंघाच्या राज्यव्यापी संघटनेच्या बांधकाम मजुर आघाडीची घोषणा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी नुकतीच केली.
शिवशाही व्यापारीसंघाची बैठक सोमवार (दि. २०) रोजी सायंकाळी पार पडली. या बैठकीत दादाराव वैजीनाथ देडे यांची शिवशाही व्यापारीसंघ बांधकाम मजुर आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, उपाध्यक्ष गोरख पाटील, नवनाथ जाधव, रविकिरण घटकार, मारूती म्हस्के, भारतीय मॉयनारिटीज सुरक्षा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मारूती कदम, अनिल तेलंगे, शिवशाही व्यापारीसंघ पिंपरी चिंचवड शहर प्रमुख विशाल बाविस्कर, बाळासाहेब गायकवाड, दिपक कांबळे, अमोल तेलंगे, दत्ता थोरात, आशिष वाळके, रवि भालेराव, दत्ता कांबळे, गोविंद सुर्यवंशी, साहेबराव शेळके, अंबादास पांढरे, संभाजी गायकवाड, विनायक मोरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.











