न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- शंभर दिवसाच्या कृती आराखड्यातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (दि.७) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पीएमआरडीएमधील अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात संपूर्ण आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, ब्रेस्ट तपासणी, ओरल कॅन्सर, स्क्रीनिंग, ब्लड, शुगर आदी आरोग्यविषयी तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. यात ३४ अधिकारी, कर्मचारी यांनी रक्तदान केले तर १८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासह तज्ञ डॉक्टरांमार्फत अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर, सह आयुक्त हिम्मत खराडे यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.