- शाळेच्या शिक्षिकेसह सफाई कर्मचारी अडचणीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- शाळेतील बारा वर्षीय मुलाला शाळेच्या शिक्षिका आणि सफाई कर्मचार्याने शाळेतील पडदा काढण्यासाठी सीडीवर चढवले. त्यात तो पाय घसरुन सिडीवरुन खाली पडला. दरम्यान या घटनेत त्याचे दोन्ही हात फॅक्चर होवून तो गंभीर जखमी होण्यास हे दोघे कारणीभुत झाले आहेत. हा प्रकार (दि.०७) सकाळी १०.१५ वा सुमारास यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा थेरगांव येथे घडला.
याप्रकरणी मनोज म्हस्के यांनी आरोपी १) महिला आरोपी, २) गणेश तांबे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार काळेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.












