न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२५) :- रामनवमी कार्यक्रमाच्या मिरवणुकीमध्ये तलवारबाजी व आगीसंबधी प्रात्यक्षीक करण्यास बंदी आहे. असे असताना सुध्दा आयोजकांनी व मल्लखांबाचे प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलाने
पोलीसांनी दिलेल्या परवानगी व नोटीशीचे उल्लंघन केले.
मल्लखांब प्रकारामध्ये आगीबाबतच्या प्रात्यक्षिकाचा समावेश करुन मानवी जिवीतास धोका होईल किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहचण्याची शक्यता होईल अशा प्रकारे हयगयीचे वर्तन केले, असं फिर्यादीत नमुद आहे. हा प्रकार (दि.०६) श्रीराम मंदीर, दाभाडे आळी, तळेगाव दाभाडे ते मारुती मंदीर चौक, तळेगाव दाभाडे दरम्यान सायंकाळच्या सुमारास घडला.
याप्रकरणी आरोपी १) सुरज सुरेश थोरात २) शिवम सुधीर कसार यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.